जळगावात दोघं भामट्यांची निवृत्ती नगरात कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- किराणा दुकानावर असलेल्या महिलेला चहाची पुडी मागून व महिलेचे लक्ष नसल्याचे पाहून त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोनपोत दोन भामट्याने ओढून नेली. ही घटना १४ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास निवृत्ती नगरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
निवृत्ती नगर परिसरात पुंडलिक पाटील यांचे किराणा दुकान आहे. दि. १४ जुलै रोजी रात्री ते घरात गेले व त्यांच्या पत्नी प्रमिला पाटील या दुकानात थांबल्या होत्या. त्या वेळी दोन जण दुकानाजवळ आले व त्यांनी चहा मसाल्याची पुडी घेतली. त्यांना पैसे परत देण्यासाठी खाली वाकल्या असता त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोनपोत ओढून दोघे जण पसार झाले. या प्रकरणी प्रमिला पुंडलिक पाटील (६०, रा. निवृत्ती नगर) यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.