मुंबई ( प्रतिनिधी )- मुंबईजवळच्या नालासोपारा परिसरात 80 वर्षीय महिलेची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. वृद्ध महिलेची राहत्या घरी हत्या करुन आरोपी फरार झाला.
नालासोपाऱ्यातील आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलकापुरी येथील लक्ष्मी निवास इमारतीच्या तळमजल्यावर 80 वर्षीय वाली शिवसागर राहत होत्या. . आचोले पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशी हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
वाली शिवसागर असे हत्या झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलकापुरी येथील लक्ष्मी निवास या इमारतीच्या तळ मजल्यावर 80 वर्षीय वाली शिवसागर राहत होत्या. भाऊबीजेच्या दिवशी वसई विरार परिसरात दोन महिलांचे मृतदेह आढळले आहेत. त्यापैकी नालासोपारा येथील वृद्धेची हत्या करण्यात आली आहे, तर विरार येथील महिलेची हत्या आहे की आत्महत्या, यावर पोलीस तपास करत आहेत.
शनिवारी दुपारी वाली शिवसागर यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर शेजाऱ्यांनी आचोळे पोलीस ठाण्याला कळवले. त्यानंतर आचोले पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला. वृद्ध महिला एकटीच घरात राहत होती. तिच्या डोक्यावर कोणत्या तरी अवजड वस्तूने प्रहार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे.