जळगावात देवेंद्र नगर येथील घटना
शबाना जावेद तडवी (वय ४५, रा. देवेंद्र नगर, संत गाडगेबाबा चौक परिसर, महाबळ, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा नुकताच सरकारी नोकरीत लागला आहे.(केसीएन) तर मुलगी शिक्षण करीत आहे. देवेंद्र नगर येथे दुमजली घरात खालील भागात शबाना तडवी यांचा भाऊ राहतो. तर वरच्या मजल्यावर शबाना या राहतात. रविवारी घरी त्यांची मुलगी होती. दुपारी शबाना यांनी त्यांच्या मुलीला कपडे बदलून येते सांगून दुसऱ्या खोलीत गेल्या. तेथे शबाना तडवी यांनी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
काही वेळाने कुटुंबियांना लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. (केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. रुग्णालयात नातेवाईकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.