नियोजन भवन येथे 19 सप्टेंबर रोजी 11 वाजल्या पासून होणार जनसुनावणी
जळगाव ;- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजल्या पासून जन सुनावणीला सुरुवात होईल.
महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे,
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता जनसुनावणी राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपर्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली तक्रारी मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे असे आवाहन जिल्हा महिला व व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.