भुसावळ (प्रतिनिधी) – येथील एका गृहिणीचा जामनेरच्या तरुणाने सोशल मीडियावर विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय त्याने पाठलाग केल्याचे गृहिणीने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
विजय वंजारी असे जामनेर येथील संशयित तरुणाचे नाव आहे. विजय वंजारी याने त्या महिलेच्या व्हाटस अॅप क्रमांकासह फेसबुक अकाऊंट लिंकच्या माध्यमातून वेळोवेळी तिच्या फोटोचे स्टेटस ठेवले. तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. विवाहितेने भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला विजय वंजारी याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक भुषण जैतकर करत आहेत.