जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जिल्हा पोलीस दलातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात योग शिबीर, मॅरेथॉन स्पर्धा, आरोग्य तपासणी, दुचाकी रॅलीचा समावेश आहे.
स्पर्धा दि. ३ ते ८ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहे. यात दि. ३ ते ७ मार्चदरम्यान सकाळी ८ ते ९ या वेळेत महिलांसाठी योग शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तर दि. ५ रोजी कराटे व स्वसंरक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. दि. ६ मार्चला सकाळी ९ वाजता वैद्यकीय तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. दि. ७ मार्चला सकाळी ६ वाजता मॅरेथॉन स्पर्धा ३, ५ किमीची धावण्याची व चालण्याची स्पर्धा होईल.
जागतिक महिला दिनी दि. ८ मार्च रोजी सकाळी महिलांसाठी नऊवारी व फेटे या पारंपरिक पोशाखात हेल्मेट घालून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. सर्व उपक्रम हे सर्व वयोगटातील महिलांना खुले आहे. अधिक माहितीसाठी महिला पोलीस अंमलदार अश्विनी निकम (९५९५०९१४२३) आणि जागृती काळे (८६०५०३८६४७) यांना संपर्क करावा असे जिल्हा पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागातर्फे करण्यात आलेले आहे.