जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्य महिला आयोगाच्या ‘ महिला आयोग आपल्या दारी ‘ या उपक्रमाचा भाग म्हणून येत्या मंगळवारी ( ८ फेब्रुवारी ) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पीडित महिलांच्या तक्रारींवर जाहीर सुनावणीच्या आयोजन करण्यात आले आहे .
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सदस्या उत्कर्षा रुपवते व दिपाली चव्हाण यांच्या उपस्थितीत ही सुनावणी होणार आहे . कोणतीही पीडित महिला कोणतीही पूर्वसूचनां न देता थेट उपस्थित राहून या सुनावणीमध्ये आपले म्हणणे लेखी मांडू शकणार आहे पोलीस खात्याकडे दाखल तक्रारी आणि महिला व बाल विकास विभागाकडे सहाय्यासाठी दाखल प्रकरणांवरही यावेळी सुनावणी होणार आहे . अधिक माहितीसाठी महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय , मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे संपर्क साधावा असे आवाहन डॉ वनिता सोनगल यांनी केले आहे .