पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मौजे माहेजी येथील नवसाला पावणारी माहेजी देवीची यात्रा सलग तिसऱ्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे रद्द करण्यात आली आहे लाखो खान्देशवासियांचे श्रद्धास्थान असणारी माहेजी देवीची यात्रा पौष महिन्यात सुरुवात होऊन पौष पौर्णिमेला यात्रेची सांगता होते. या १५ दिवसांच्या कालावधीत गिरणा नदीच्या काठावर भाविक भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात सुरु केली जातात . पूजेच्या साहित्यांपासून लहान मुलांच्या खेळणी पर्यंत विविध वस्तूंची विक्री करणारी दुकाने थाटली जातात . तसेच अनेक लोकप्रसिद्ध लोकनाट्य तमाशा मंडळे देखील या यात्रेत दाखल होत असल्याने पंचक्रोशीच नव्हे तर संपूर्ण खानदेशातून भाविक आणि रसिक मंडळी या यात्रेला आवर्जून उपस्थिती देतात. मात्र सध्या वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव अर्थात तिसरी लाट आल्याने यंदाही साध्या पद्धतीने माहेजी देवीची यात्रा साजरी करण्यात येत आहे .
यामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे . कोणीही आपले दुकाने लावू नयेत असे आवाहन माहेजी येथील पोलीस पाटील आणि ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे .