चला, विकासासाठी महायुतीला साथ देऊया; भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ केतकी ताई पाटील यांचे मतदारांना आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : – जळगाव महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि रिपाई महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर येथे प्रचार रॅली काढण्यात आली.

राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली व आ.राजुमामा भोळे, आ.मंगेश दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रचार रॅली झाली. या रॅलीत भाजपा जळगाव जिल्हा पूर्व च्या सरचिटणीस डॉ .केतकी ताई पाटील, महायुतीचे उमेदवार बाविस्कर उज्वला किशोर, जगताप पूजा विजय, विजय गजानन बांदलसह, राजू भाऊ मराठे, महेश दादा चौधरी, संजय शिंदे, रुपेश ठाकूर, तुषार सूर्यवंशी, जहांगीर खा , रितेश जाधव, मीरा बाई बांदल, संदीप ठाकूर, किशोर बाविस्कर आदी उपस्थित होते.
आज प्रचार रॅलीला प्रभाग क्रमांक २ क च्या उमेदवार सौ. पूजाताई विजय जगताप यांच्या निवासस्थानापासून झाली. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद रॅलीस लाभला. रॅलीद्वारे संपूर्ण शिवाजी नगर परिसर पिंजून काढण्यात आला.
रॅलीत फिरतांना जिल्हा सरचिटणीस डॉ केतकी ताई पाटील यांनी उमेदवारांसमवेत मतदार बंधू भगिनींच्या भेटी घेतल्या व आपले अमूल्य मत महायुतीच्या उमेदवारांना देऊन विजयी करा, अशी विनंती केली. मतदारांनी देखील स्वागत करून रॅलीस प्रतिसाद दिला.










