पिंप्राळ्यात ‘महायुती’चा वारू सुसाट! पहिल्या फेरीत भाजप-शिवसेना युतीची मोठी आघाडी


जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पिंप्राळा परिसरातील १० जागांच्या पहिल्या फेरीचे कल हाती आले असून, येथे महायुतीने (भाजप-शिवसेना) महाविकास आघाडीला धोबीपछाड दिल्याचे चित्र दिसत आहे. १० पैकी बहुतांश जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत.
प्रभागनिहाय निकाल आणि आघाडी
प्रभाग ८ अ: शिवसेनेच्या उज्वला कुलभूषण पाटील (८१३ मते) यांच्या तुलनेत भाजपच्या कविता सागर पाटील २३०४ मते घेऊन मोठ्या आघाडीवर आहेत.
प्रभाग ८ ब: भाजपच्या मानसी भोईटे (२४५५ मते) यांनी ठाकरे गटाच्या शोभा सोनवणे (६०९ मते) यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली आहे.
प्रभाग ८ क: भागचंद जैन १९३६ मतांसह आघाडीवर असून मयूर कापसे (१०७२) आणि विजय पाटील (७२) पिछाडीवर आहेत.
प्रभाग ८ ड: नरेंद्र आत्माराम पाटील यांनी २०३३ मते घेत आपले वर्चस्व राखले आहे.
बिनविरोध आणि अटीतटीची लढत:
प्रभाग ९ अ मधून मनोज सुरेश चौधरी आणि ९ ब मधून प्रतिभा गजानन देशमुख यांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे, ज्यामुळे महायुतीचा उत्साह द्विगुणित झाला आहे.






