पाचोरा- येथील आमदार यांच्या नेतृत्वात शिवसेनेने पाचोरा व भडगाव तालुक्यात दिनांक ७ जून रोजी तालाठोक-हल्लाबोल आंदोलन केले. त्यावेळी भडगाव येथील महावितरण कार्यालयात काही संशयित व्यक्तींनी तोडफोड करत अभियंता अजय धामोरे यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यात कै. गजानन राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु घटना घडून तीन दिवस झाले तरीही गुन्हेगारांना अजून पर्यंत अटक झालेली नाही तरी या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा तालुक्यातील सकल धनगर समाजाने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता दासकर यांना निषेध निवेदन देऊन गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली. तसेच लवकरात लवकर अटक न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा यावेळी समाजाच्या वतीने देण्यात आला.