धरणगाव तालुक्यातील भोद खुर्द येथील घटना
धरणगाव प्रतिनिधी :- तालुक्यातील भोद खुर्द शिवारात महावीर कॉटन जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमधून २ अज्ञात चोरट्यांनी एकूण ५ लाख ३० हजार ७६० रुपयांची रोकड लांबवली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात २ अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
गुरुवारी २ जानेवारी रोजी रात्री ते शुक्रवार ३ जानेवारी रोजी पहाटे सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान, हेल्मेट घालून आलेल्या चोरट्यांनी टॉमीच्या साहाय्याने महावीर कॉटन जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीच्या कार्यालयातील टेबलाच्या ड्रॉवरला टॉमीने फोडून त्यातील ५ लाख ३० हजार ७६० रुपयांची रोकड लांबवली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर मशीनदेखील सोबत नेले होते. परंतु दुसऱ्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश पाटील करीत आहेत.