जळगाव (प्रतिनिधी) – महात्मा गांधी यांच्या ७४ व्या पुण्यतिथी निमित्त ३० जानेवारी रोजी गांधी तीर्थ येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून उदय पारकर यांचे जीवन सादगी आणि आंतरराष्ट्रीय चित्रकार वासुदेव कामत यांचे गांधीजी कि प्रासंगिकता या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गांधी तीर्थ फेसबुकवरून याचे ३० रोजी दुपारी ३ वाजता थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल काकोडकर आणि संचालक अशोक जैन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आणि आंतराष्ट्रीय पोस्टर स्पर्धा विजेत्यांच्या नावांची घोषणा यावेळी करण्यात येईल. या ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.