कोळी समाजाच्या बांधवांची बैठक उदळीत संपन्न
रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यात महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचं ठरवण्यात आलं आहे. या संदर्भात, कोळी समाजाच्या बांधवांची बैठक उदळी येथील उदलक ऋषी मंदिरात नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष हरलाल कोळी होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपापले विचार मांडले. मनोहर कोळी यांनी जयंती साजरी करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी संतोष सपकाळे यांनी समाजात जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली. तर माजी जिल्हा परिषद सदस्य आत्माराम कोळी यांनी तरुणांना समाजाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलं. अध्यक्षीय भाषणात हरलाल कोळी म्हणा की, महर्षी वाल्मिकी हे सर्व आदिवासी कोळी समाज बांधवांचे आराध्यदैवत आहेत. त्यांची जयंती गावागावात साजरी होते, त्याचप्रमाणे तालुका स्तरावरही मोठ्या संख्येने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
यासाठी, समाजातील प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एक दिवस समाजासाठी देण्याचा संकल्प केला पाहिजे. तरच ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल. या बैठकीत सदाशिव कोळी, योगेश्वर कोळी, बंडु कोळी, शिवाभाई, तुषार कोळी, मधुकर कोळी, दत्तात्रय गुरुजी, सागर खवले, गोकुळ झाल्टे, भूषण तायडे, नितीन कोळी, राहुल सोनवणे, सुभाष सपकाळे, विजय कोळी, आश्विन कोळी, बंटी कोळी, शाताराम कांडेले, दीपक कोळी, विनायक कोळी, सोनू कोळी, अशोक कोळी यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर कोळी यांनी केले, तर आभार चंद्रकांत कोळी यांनी मानले.