नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पावसाने हाहाकार माजवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं आहे. अशावेळी केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतीसाठी 700 कोटींची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत याबाबतची माहिती दिली.
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्रसिंह तोमर यांनी महाराष्ट्राला देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती दिली. पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्राने 700 कोटी रुपये मंजूर केले आहेत, असं तोमर यांनी सांगितले.