• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

जळगाव, धुळे, नंदुरबारसह राज्यातील योग शिक्षक एकवटले!

जळगाव ( प्रतिनिधी ) – शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने जळगाव शहरातील मायावती नगर येथील रोटरी भवनमध्ये शनिवारी (२८ फेब्रुवारी) एकदिवसीय राज्यस्तरीय योग शिक्षक संमेलनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या संमेलनात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमधून ३०० हून अधिक योग शिक्षक व साधकांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता दीपप्रज्वलनाने व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. व्यासपीठावर सारस्वत अतिथी म्हणून डॉ. राजेश जैन, प्रमुख अतिथी प्रसाद कुलकर्णी, संस्थापक सदस्य कृणाल महाजन, योगशिक्षक समितीचे सदस्य डॉ. देवानंद सोनार, महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे विभाग प्रमुख सुनील गुरव आणि जिल्हाध्यक्ष चित्रा महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक ‘ॐकार’ साधनेने करण्यात आली, ज्यामुळे वातावरणात सकारात्मकता निर्माण झाली. संमेलनाचे प्रास्ताविक कृणाल महाजन यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून संघटनेच्या कार्याचा आढावा घेत योग शिक्षकांच्या संघटनशक्तीवर भर दिला. यानंतर प्रमुख मार्गदर्शक प्रसाद कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना योगाचे महत्त्व, आधुनिक काळातील त्याची गरज आणि योग शिक्षकांसमोरील आव्हाने यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप करताना सुनील गुरव यांनी योग हा केवळ व्यायाम नसून ती एक जीवनशैली असल्याचे अधोरेखित केले.

हे संमेलन यशस्वी करण्यासाठी निसर्गोपचार समितीचे अध्यक्ष डॉ. सोनल महाजन, लीगल सेल सदस्य ॲड. स्वाती निकम, उपाध्यक्ष अर्चना गुरव, महासचिव पांडुरंग सोनार, कोषाध्यक्ष नूतन जोशी, सचिव पल्लवी उपासनी, सोनाली पाटील, सहसचिव कैलास पाटील, संघटन सचिव ललिता झंवर, सोशल मीडिया प्रभारी रोहन चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या योग शिक्षकांमुळे हे संमेलन खऱ्या अर्थाने यशस्वी ठरले. सूत्र सूत्रसंचालन नीलिमा लोखंडे यांनी केले व कविता चौधरी जयश्री रोटे वैशाली चौधरी राकेश शेठ साठे कैलास पाटील, भावना चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.


 

 

Tags: maharashtra yog shikshak shaghha news
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Next Post

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon