जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संघटना युवा प्रदेश कार्यकारणी, जळगांव, नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहीर संस्थेचे प्रदेश अध्यक्ष भिमराज घुगरे, प्रदेश कार्याध्यक्ष, राजेंद्र गठरी, प्रदेश सचिव राजेंद्र बिडकर, महादू उदीकर, प्रकाश घुगरे, अनिल जोमीवाळे, गोपाळ लगडे, महादू हिरणवाळे, सुपाजी पिरणाईक, सदाशिव निस्ताने मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरवातीला समाजाचे आराध्य दैवत श्री शिदाजीआप्पा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जळगांव ,नांदेड,धुळे तसेच प्रदेश युवा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यात महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष पदी अक्षय बहिरवाडे अहमदनगर ,श्री कृष्णा खंडूआप्पा गठरी यांची महाराष्ट्र युवा प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड ,धुळे जिल्हा युवा अध्यक्ष पदी धुळे राजेंद्र घुगरे,युवा प्रसिध्दी प्रमुख पदी राहुल बिडकर यांची निवड करण्यात आली.जळगांव जिल्हा नूतन अध्यक्ष पदी दिपक जोमीवाळे, उपाध्यक्ष रवींद्र परलकर, कार्याध्यक्ष प्रकाश लंगोटे,जिल्हा सचीव नारायणराव बारसे, जिल्हा खजिनदार शंकर काटकर, नांदेड जिल्हाअध्यक्ष गजानन तोडली,जिल्हा उपाध्यक्ष तारकेश तपासे, माधव गवळी, जिल्हा कार्याध्यक्ष शरद औरंगे,जिल्हा सचीव आनंद तपासे आदी मान्यवरांची निवड करण्यात आली.समाजातील विद्यार्थीनी कु.प्रतीक्षा चिपडे (चाळीसगांव) यांचा पुणे येथे IT कंपनीत नोकरी मिळाली म्हणून सत्कार करण्यात आला. समाजातील धुळे महानगरपालिका महापौर भगवान पंगुडवाले यांचा ही सत्कार करण्यात आला. सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.







