दुसर्यास्थानी काँग्रेस , तिसऱ्या क्रमांकावर भाजप तर चौथ्यास्थानी शिवसेना
मुंबई (वृत्तसंस्था ) :- राज्यातील १०६ नगरपंचायतींच्या ३४४ अनारक्षित जागांचा आज निकाल लागत आहे. तसेच भंडारा, गोंदिया या दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार काल, मंगळवारी नगरपंचायतींसाठी सरासरी ८१ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील ९३ नगरपंचायतींमधील ३३६ जागांसाठी मंगळवारी सरासरी ८१ तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या २३ आणि त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या ४५ जागांसाठी ७३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायती, भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार विविध महानगरपालिकांतील ४ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते. पण या ठिकाणी मंगळवारी मतदान झाले आहें.
आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालात भाजपाने २४ नगरपंचायतमध्ये विजय मिळवला आहे, तर शिवसेना १६, आणि राष्ट्रवादी ३१, तर काँग्रेस २७ नगरपंचायतमध्ये विजयी संपादन केला आहे, अपक्षांनी ७ ठिकाणी विजय मिळवला आहे,
दिग्गजांना धक्का
दरम्यान, शिवसेनेला कमी जागा मिळाल्या आहेत, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेसाठी हे चांगले नाही. शिवसेना शेवटच्या म्हमजे चौथा क्रंमाकावर फेकली गेली आहे, नगरपंचायतीत भाजपालाही दणका बसला असून, ते क्रमांक ३ वर घसरले आहेत. तर राष्ट्रवादी, काँग्रेसला चांगला फायदा झालेला दिसतोय. तर क्रमाक एकाच पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत दिग्जांना धक्का बसला आहे, कोकणात वैभव नाईक पराभूत झालेत, तर बीडमध्ये धनंजय मुंडेंना हार पत्करावी लागली आहे, विदर्भातील अमरावतीत मंत्री यशोमती ठाकूर यांच् सुद्धा पराभव झाला आहे, तर नगरमध्ये माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवारांनी बाजी मारली आहे.
१०६ निकालांपैखी १०० नगरपंचायतीचे निकाल लागले, सध्या हाती आलेल्या नगरपंचायतीमधील निकाल
राष्ट्रवादी:- ३१
काँग्रेस:- २७
भाजप:- २४
शिवसेना:- १६
अपक्ष:- ०७