जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत आज महापौर जयश्री महाजन यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध जाहीर झाली आहे .
महापौर जयश्री महाजन यांचे प्रतिस्पर्धी आमदार राजूमामा भोळे आणि योगेश नारायण पाटील यांनीं माघार घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली . आज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकून सर्व उमेदवार मागे घेतल्याने आता महाविकास आघाडीकडून निवडले जाणारे संचालक मंडळ सत्तेवर येणार आहे.