मुंबई;- जळगाव शहर महापालिकेच्या महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज शिवसेनेचे प्रवक्ते आणि खा. संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांना पत्रकारांनी मनपाचे नगरसेवक पक्षांतर करून सेनेत प्रवेश घेण्याबाबत विचारणा केली असता फडणवीस यांनी यावेळी याचे उत्तर देणे टाळले.
महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.
याप्रसंगी जळगावचे संपर्क प्रमुख संजय सावंत आणि रावेरचे संपर्क प्रमुख विलास पारकर, माजी उपमहापौर सुनील महाजन यांची उपस्थिती होती.