महापौर , उपमहापौर आणि आयुक्तांसह मान्यवरांनी लेझीमवर धरला ठेका
घरगुती गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप ; सर्वत्र जल्लोषाचे वातावरण
जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव शहरातून आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीला जळगावच्या मानाच्या महापालकेच्या गणपती मिरवणुकीपासून आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रारंभ करण्यात आला . यावेळी महापौर , उपमहापौर आणि आयुक्तांसह मान्यवरांनी लेझीमवर ढोलताशांच्या गजरात ठेका धरला . तसेच आज मेहरूण तलावावरील गणेश घाटावर घरगुती गणपती विसर्जनाला सुरवात झाली असून आपल्या लाडक्या गणपतीला नागरिकांनी मनोभावे निरोप द्यायला सुरुवात केली आहे. शहरासह जिल्ह्यात आज गणेश विसर्जनानिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.