तरुण व्यक्तिमत्व मानसी भोईटे : विकासपर्वासाठी प्रभाग क्रमांक ८ मध्ये इच्छुक
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात प्रभाग ८ मध्ये पिंप्राळा भागात राजकीय घराण्याचा वारसा असूनही मात्र स्वतःची एक वेगळीच छाप सोडण्यासाठी व परिवर्तनाचा ध्यास घेऊन मानसी भोईटे या आगामी महानगरपालिका निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. तरुण तडफदार व महिला नेतृत्व असल्यामुळे मानसी भोईटे यांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. मागील पचवार्षिकमध्ये ना. गिरीशभाऊ महाजन, शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सासूबाई लताताई भोईटे यांनी प्रभाग ८ मध्ये केलेल्या अभूतपूर्व विकासकामांचा भक्कम पाया घेऊन, तरुण नेतृत्व मानसी भोईटे या नगरसेवक म्हणून निवडणूक लढवीत आहे.

जळगावच्या नागरिकांसाठी एक उच्चशिक्षित, संवेदनशील आणि कृतीशील नेतृत्व महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने उपलब्ध होत आहे. मानसी भोईटे यांच्या रुपाने, ‘विकसित प्रभागातून ‘आधुनिक’ आणि ‘आरोग्यसंपन्न’ शहराकडे वाटचाल करण्याची तयारी सुरू झाली आहे. कला क्षेत्रातील योगदानासह मानसी भोईटे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. अध्यापन क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. मोफत योग वर्ग आहार सल्ले दिले आहेत. आरोग्य शिबिरातून घेतले आहेत. अध्यापनाच्या माध्यमातून त्यांनी समाजाशी जोडणी साधली आहे, पत्रकारिता परीक्षेत प्रथम क्रमांकाने यशस्वी झाल्यानंतर त्यांना मराठी वृत्तवाहिनी मध्ये वृत्तनिवेदिका म्हणून देखील संधी मिळाली. योगशिक्षिका म्हणून काम करताना, शहरातील आणि परिसरातील अनेक विद्यार्थिनींना भारतीय योग आणि संस्कृतीचे धडे दिले आहेत.
लताताई भोईटे यांनी उभारलेल्या “निर्वाचित प्रभागा’ चा वारसा आता त्यांची सून मानसी भोईटे या आधुनिक नेतृत्वाने पुढे घेऊन जाण्यास सज्ज झाल्या आहेत. कुटुंबाचा विकासाचा आणि नेतृत्वाचा वारसा चालविण्यासाठी त्या तरुण आणि उच्चशिक्षित प्रतिनिधी म्हणून पुढे येत आहेत. मानसी भोईटे या केशवराव भोईटे (ज्यांना ‘सरकार’ म्हणून संबोधले जाते) यांच्या कुटुंबातील स्नुषा आहेत. सासरे रणजीत केशवराव भोईटे हे व्यक्तिमत्व जळगाव शहराला सुपरिचित होते, सासूबाई आणि सासरे या दोघांनीही नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये सुमारे ३५ वर्ष प्रतिनिधित्व केले, रणजीत भोईटे आणि लता भोईटे यांनी प्रभाग क्रमांक ८ व ९ मध्ये नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी अमूल्य योगदान दिले आहे. प्रेम नगर, भिकमचंद जैन नगर, माढा कॉलनी, वाघुळदे नगर, कांचन कॉलनी गुड्डू राजा नगर, मुक्ताईनगर, निवृत्ती नगर, दादावाडी, भोईटेनगर, पिंप्राळा परिसरातील काही भाग ते थेट निमखेडी शिवारपर्यंत पक्के रस्ते, गटारी, त्याचप्रमाणे खुले भूखंड विकसित करण्यात भोईटे यांनी अविरत परिश्रम घेतले.

आजचे केरळी मंदिर असेल, विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेल, ओम शांतीनगरमधील महादेवाचे मंदिर असेल, किंवा मराठा सेवा संघाचे कार्यालय आणि त्यासाठी उपलब्ध करून दिलेला खुला भूखंड, त्या कुटुंबाचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी तसेच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी करण्याचा मनोदय मानसी भोईटे यांनी मनात बाळगला आहे. भारतीय जनता पक्षाकडून त्या इच्छुक आहे. पती, नीलेश रणजीत भोईटे, हे देखील शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.
मानसी भोईटे ह्या इतक्या भक्कम सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीवर, तरुण नेतृत्व म्हणून आता राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “कुटुंबातील वरिष्ठांनी विकासाचा जी पाया रचला, तो आता आधुनिक युगाच्या गरजांनुसार ‘डिजिटल’ आणि ‘आरोग्यपूर्ण’ करण्यासाठी मी सज्ज आहे. शैक्षणिक अनुभवाचा जोरावर आणि आरोग्य क्षेत्रातील अनुभवामुळे, महापालिकेशी जोडले गेल्यावर माझे सेवाकार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे करता येईल.” मानसी भोईटे यांच्या रुपाने जळगाव शहराला एक युवा, उच्चशिक्षित आणि समर्पित महिला नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे. त्या आधुनिक विचारसरणी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पारंपरिक मूल्यांचा समन्वय साधणारे व्यक्तिमत्त्व आहेत.
भारतीय जनता पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून त्या प्रभाग ८ मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या नेतृत्वात, विकासकामांचा वारसा घेऊन जळगाव शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळू शकेल, मानसी भोईटे यांचे राजकारणातील पदार्पण हे केवळ एका उमेदवाराचे आगमन नसून, जळगाव शहराच्या विकास आणि प्रगतीसाठीचे एक आश्वासक पाऊल आहे. पक्षश्रेष्ठींनी नवीन तरुण महिला व उच्चशिक्षित म्हणून मानसी भोईटे यांना संधी द्यावी अशी प्रभाग ८ येथील नागरिकांची देखील मागणी आहे.









