रस्तादुरुस्तीसाठी साडेपाच कोटी, पाणीपुरवठा योजनेकामी रु. १३.५५ कोटी अनुदान
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव महानगरपालिकेचा सन २०२५-२०२६ चा १२४७ कोटीचा अर्थसंकल्प आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी मनपाच्या १३ व्या मजल्यावरील त्यांच्या दालनात आज गुरुवारी दि. १३ फेब्रुवारी रोजी सादर केला. यावर्षी करामध्ये कोणतीही वाढ केलेली नसल्याचे आयुक्तांनी सांगीतले. यावेळी महापालिकेचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सन २०२५ २०२६ या आर्थिक वर्षात महसूली व भांडवली लेखाशिर्षाअंतर्गत महत्वाच्या बाबींवर खर्चाची तरतुद करण्यात आलेली आहे. यात मालमत्ताकर व पाणीपट्टीकर मॉड्युल्सचे आयजीआर प्रणालीशी एकत्रीकरण करणे यासाठी रु. १ कोटी तसेच गाळाभाडे/ नुकसान भरपाई व परवाना फी, मनपा मालमत्ता संगणकीकरणाकामी रु.१ कोटी, विद्युत विभागाअंतर्गत एलईडी पथदिवे लावणे/ सौरउर्जा संवर्धन प्रकल्प/ चार्जिंग स्टेशनकामी रु.५.२५ कोटी तसेच नाले स्वच्छतेकामी रु. २ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
दवाखाने विभागासाठी औषध खरेदी / उपकरणे, श्वान दंश लस :- रु.३५ लक्ष, साथिचे रोग/मलेरीया/संसर्गजन्य रोग प्रतिबंधक उपाययोजनेकामी औषधी व उपकरणे खरेदी :- रु.४५ लक्ष, स्मशानभुमी दुरूस्तीकामी रु.६० लक्ष, बालगंधर्व खुले नाट्यगृह व्यवस्था व दुरूस्ती :- रु. १० लक्ष, सार्वजनीक उद्याने व्यवस्था व दुरूस्ती :- रु.२ कोटी, प्रशासकीय इमारत व्यवस्था व दुरूस्ती :- रु. ५.५५ कोटी, रस्ता व्यवस्था व दूरूस्ती :- रु.५.५० कोटी, स्वच्छतागृहे व्यवस्था व दुरूस्ती रु.४० लक्ष तर गटार व्यवस्था व दूरूस्ती :- रु.३० लक्ष तरतूद आहे.
पुतळे व्यवस्था व दूरूस्ती :- रु.१२ लक्ष, शहरात दिशा दर्शक फलक लावणे :- रु.२५ लक्ष, आर्थिक दुर्बल घटक/मागासवर्गीय कल्याण निधी रु.२.५० कोटी
महिला व बालकल्याण निधी रु.२.५० कोटी, दिव्यांग कल्याण निधी रु.२.५० कोटी, क्रिडा साहित्य/क्रिडा स्पर्धा / महापौर चषक / मनपा वर्धापन दिन साजरा करणे :- रु.४५ लक्ष, मनपा मिळकती सर्वेक्षण व व्हॅलुएशन रु.८० लक्ष तर पर्यावरण सुधारणा व नविन झाडे लावणेसाठी रु. ७५ लक्ष तरतूद करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन निवारण साठी रु.१५ लक्ष,डिजीटल शाळा करणे व आदर्श शाळा योजना, शाळेचा दर्जा उंचावणे :- रु.१३ लक्ष ठेवण्यात आले आहे.
शाळा इमारत दुरूस्ती व संरक्षक भिंत दुरूस्ती रु. १.५० कोटी, नगरसेवक/पदाधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण :- रु.४५ लक्ष, नगरसेवक स्वेच्छा निधी / प्रभाग विकास निधी :- रु.६ कोटी, कर्मचारी वर्ग यांना ७ वा वेतन आयोग फरक :- रु. १८ कोटी, निवृत्ती वेतनधारक ७ वा वेतन आयोग फरक :- रु.६ कोटी, नविन गटारी :- रु.६ कोटी, नविन स्वच्छतागृहे बांधणे रु. १ कोटी, नविन बगीचे :- रु.५० लक्ष, नविन इमारत/फायर स्टेशन बांधणे :- रु. ५ कोटी, नविन रस्ते :- रु. १६ कोटी, रहदारी सुखसोई रु. २ कोटी, नविन फायर वाहन/ आरोग्य वाहन खरेदी :- रु. ४ कोटी, ई गव्हर्नस साहित्य व व्यवस्थापन :- रु. १.५० कोटी अशी तरतूद झाली आहे.
भुसंपादन मोबदलाकरीता :- रु. २१ कोटीची तरतूद आहे. नविन विद्युत पोल उभारणे / विज वाहीनी स्थलांतर / नविन लाईट व्यवस्था :- रु.१.२५ कोटी, गुरांसाठी पाणी हौद / गावहाळ बांधणे रु. १० लक्ष, प्रमुख नाले संरक्षक भिंत बांधणे रु. १ कोटी, पाणी शुध्दीकरणासाठी :- रु.२.५० कोटी, नविन पाईप लाईन व्यवस्था व दुरूस्ती :- रु.५.५० कोटी, शासन अनुदानीत योजनांकामी मनपा हिस्सा :- रु. ३१ कोटी, पाणीपुरवठा योजनेकामी मनपा अनुदान :- रु. १३.५५ कोटी दिले जाणार आहे.