आ. राजूमामा भोळे यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. बैठकीमध्ये महामार्गावरील अपघात प्रकरणी जबाबदार संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे आदेश पालकमंत्र्यांनी पोलीस निरीक्षकांना दिल्याची माहिती शहराच्या आमदार राजूमामा भोळे यांनी दिली आहे.
आज जिल्हाधिकारी दालनामध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महामार्गाच्या समस्या संदर्भात बैठक झाली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महामार्ग बायपास, खड्डे, गतिरोधक असे विविध विषय चर्चेला होते. महामार्गावरील रस्ते लवकर दुरुस्त करावे, मार्चच्या आत त्यांनी बायपासचा प्रश्न मार्गी लावावा, महामार्गावर अपघात झाल्याप्रकरणी संबंधित दोन्ही ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पालकमंत्र्यांनी पोलीस निरीक्षकांना सूचना केले आहेत अशी माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली.
लवकरच संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल होतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे. रस्ते लवकरात लवकर कसे मेंटेन होतील याबाबत आम्ही लोकप्रतिनिधी यामध्ये लक्ष घालू असे आमदार भोळे म्हणाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची बोलणे झाले आहे समांतर रस्त्याचा प्रश्न देखील लवकरच मार्गी काढला जाईल टेंडर बाबत असणाऱ्या त्रुटी लवकरच दूर केल्या जातील असे आमदार भोळे म्हणाले.