व्हायरल आजारांमुळे रुग्णसंख्येत होतेय वाढ
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पीटल प्रशासनाने मेडिसीन (औषधवैद्यकशास्त्र) विभागाची बाह्य रुग्ण सेवा (OPD) अत्यंत कमी दरात तपासणी फी सह सुरू केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या ओपीडीमुळे शहरातील नागरिकांना आता सामान्य आजारांपासून ते दीर्घकालीन व्याधींपर्यंत विविध आरोग्य समस्यांवर वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेणे अधिक सुलभ झाले आहे. या मेडिसीन ओपीडीमध्ये एम.डी. मेडिसीन पदवीधारक असलेले तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर्स उपलब्ध आहे.
यात डॉ. विनोद बाविस्कर, डॉ.जयेश पाटील, डॉ. तेजस खैरनार, डॉ. तन्मय मेहता हे डॉक्टर्स प्रमुख आजारांवर तपासणी, निदान आणि उपचार देत आहेत. यात ताप, सर्दी, खोकला, मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड संबंधित विकार, पचन संस्थेचे आजार, फुफ्फुसांचे आणि श्वसनाचे आजार, हृदयरोग, न्यूमोनिया, यकृत आणि किडनीचे प्राथमिक आजार, टायफॉइड, मलेरिया, फिट येणे, लकवा, थॅलेसेमिया आदी आजारांवर उपचार व मार्गदर्शन करीत आहे.
ओपीडीची वेळ ही सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. महादेव हॉस्पीटलचे व्यवस्थापन मंडळाने या नव्या सुविधेबद्दल आनंद व्यक्त केला असून, ही ओपीडी नागरिकांसाठी एक मोठा दिलासा ठरेल, अशी आशा व्यक्त केली आहे. तरी, सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पीटल प्रशासनाने केले आहे.









