जळगाव – कोकण पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावांमध्ये पावसाचे थैमान घातंल्याने अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. आज टायगर ग्रुपनेही पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला .
टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष पैलवान जालिंदर जाधव, टायगर ग्रुप अध्यक्ष डॉ . तानाजी जाधव , सागर कांबळे व खान्देश आध्यक्ष ऋषिकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप खानदेश विभागांमधून मदत पोहचविण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील टायगर ग्रुप च म्हसावदतर्फे व ग्रामस्थांच्या सहकार्याने कोकण चिपळूण कोल्हापूर या तिन्ही पूरग्रस्त भागांमध्ये मदत म्हणून किराणा किट बनवून टायगर ग्रुप म्हसावद मार्फत किराणा किटचे साहित्य मिनी ट्रक द्वारे रवाना करण्यात आले.याप्रसंगी टायगर ग्रुप म्हसावद व ग्रामस्थ उपस्थित होते.