भुसावळच्या तरुणाची न्यायालयीन कोठडीत रवानगी
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील एका भागातील २१ वर्षीय तरुणीच्या घरात संशयीताने अनधिकृतपणे प्रवेश करीत अतिप्रसंग केल्याची घटना १० रोजी रात्री ३ वाजता घडली. याप्रकरणी संशयीत शेख कलीम शेख सलीम रां.दीनदयाल नगर, भुसावळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.
शहरातील एका भागात पीडीता कुटूंबासह वास्तव्यास असून आरोपी शेख कलीम याने १० रोजी रात्री तीन वाजता तिच्या घरात अनधिकृतरीत्या प्रवेश करून पीडीतेच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. पीडीतेने बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. संशयीताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर संशयीताची कारागृहात रवानगी करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.