कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार
जळगाव (प्रतिनिधी) : – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांच्या पुढाकाराने चिपळूण येथील पूरग्रस्तांना ३१ क्विंटल जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली आहे. ही मदत शुक्रवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता पोहचली असल्याचीमाहिती कैलास चौधरी यांनी दिली आहे.
यात गहु – १२ क्विंटल, तांदुळ २ क्विंटल, दादर ३ क्विंटल, बाजरी ३ क्विंटल, पोहे१ क्विंटल, चनादाळ १.५० क्विंटल, तुरदाळ १.५० क्विंटल, मुगदाळ १ क्विंटल, मठ १ क्विंटल, आटा ६.५० क्विंटल असा एकुण ३१ क्विंटल जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली आहे.
याकामी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, उपसभापती सुरेश पाटील, संचालक अनिल भोळे, व्यापारी संचालक शशी बियाणी, नितीन बढे, वसंत भालेराव, लक्ष्मण पाटील यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व व्यापारी महामंडळाचे संचालकांचे सहकार्य लाभले.
याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख सचिन कदम यांच्या कडे चिपळूण येथे शुक्रवारी ६ ऑगस्ट रोजी मदत दुपारी पोहोचणार आहे, अशी माहिती कैलास चौधरी यांनी दिली.







