जळगाव (प्रतिनिधी ) ;- एका तरुणाला पोलिसांना माहिती पुरवीत असल्याच्या कारणावरून तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील गोपाळपुरा भागात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, आकाश पवार (वय-२१) रा. श्रीकृष्ण नगर, गोपाळपुरा जळगावहा २३ जून रोजी रात्री ९ वाजता दुकानावर काम करत असतांना अमोल पाटील व तुषार पाटील आले. पोलीसांना माहिती का पुरवतो असे विचारले असता मी माहिती पुरवित नाही असे आकाशने सांगितले. याचा राग आल्याने अमोल पाटील आणि तुषार पाटील यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तर सागर चौधरी हा काठी घेवून आकाशच्या कानवर मारली. यात आकाश पवार यांच्या कानाला दुखापत झाली. आकाश पवार याच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे करीत आहे.