नेत्र व शारीरीक तपासणी शिबिरातून आरोग्या जागर
खान्देश व विदर्भात शिबिरांचे आयोजन,६६ मोतिबिंद रूग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया
जळगाव (प्रतिनिधी):- गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्ताने खान्देश व विदर्भात नेत्र व शारीरीक तपासणी शिबिरातून आरोग्याचा जागर केला जाणार आहे.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे तज्ञ डॉक्टर दि २२ ते २८ फेबु्रवारीपर्यंत खान्देशातील विविध गावात जावून नागरिकांची नेत्र व शारीरीक तपासणी करणार आहे. यातील ज्या रूग्णांना शस्त्रक्रियेची गरज असेल असे रूग्ण शोधून त्यांच्यावर ताबडतोब महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी तज्ञांच्या टीमला आरोग्य मित्र व गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या कर्मचारी सहकार्य करणार आहे. तसेच रूग्णालयाच्या नेत्र विभागाने ६६ नेत्र रूग्णांची तपासणी व शस्त्रक्रियेचा मानस व्यक्त केला असून दि २३ रोजी वाढदिवस निमीत्त या रूग्णांशी माजी खा.डॉ.उल्हास पाटील शस्त्रक्रियेनंतर संवाद साधणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्याच्या जागर मध्ये सहभागी होवून तपासणी करून घ्यावी असे आवाहन रूग्णालय प्रशासनाने केले आहे.









