जळगाव:- भडगाव येथील दिनांक 7 जून रोजी वीज कंपनीचे अभियंता व कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जळगाव येथे महावितरणच्या झोन ऑफिस समोर वीज कर्मचारी संघटनांनी निषेध सभा आयोजित केली होती.
या भ्याड हल्ल्यात वीज कर्मचारी गजानन राणे यांचा मृत्यू झाला आहे.या घटनेची गंभीर दखल संघटनांनी व वितरण कंपनी प्रशासनाने घेतली आहे.
जिल्ह्यातील सर्व संघटना प्रतिनिधी व कर्मचारी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याच प्रमाणे मुख्य अभियंता मा. दीपक कुमठेकर ,अधीक्षक अभियंता मा.फारुख शेख व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांनी या सभेत उपस्थिती देवून प्रशासन कर्मचारी व त्यांच्या संघटनांच्या पाठीशी भक्कम उभे असल्याची ग्वाही दिली.
या प्रसंगी बहुजन विद्युत अभियंता ,अधिकारी व कर्मचारी फोरमचे केंद्रीय कार्याध्यक्ष धर्मभुषण बागुल यांनी…
*मृत कर्मचारी दिवंगत गजानन राणे यांच्या परिवारास 50 लाख मदत निधी देण्यात यावा.
*त्यांच्या वारसास त्वरित नोकरीत सामावून घ्यावे.
*हल्लेखोरांना त्वरित अटक करण्यात यावी.*या हल्ल्यामागे आलेले खरे चेहरे शोधण्यात यावे.
•वीज कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत ठोस भूमिका घेण्यात यावी.
*व असे हल्ले होणार नाहीत यासाठी उपाय योजना करण्यात यावी , अशा मागण्या संघटनेच्या वतीने मांडल्या व आरोपींना 7 दिवसाच्या आत अटक न झाल्यास झोन व्यापी तीव्र काम बंद आंदोलन केले जाईल असा इशारा ही दिला.
फोरम चे सहसचिव श्री बी डी जाधव यांनी ही आपले विचार मांडले.
सर्व संघटना पदाधिकाऱ्यांनी सदर घटनेचा तीव्र निषेध केला असून ,कर्मचाऱ्यांची एकजूट अभेद्य राहील व येत्या 7 दिवसात जोरदार आंदोलन केले जाईल असा एकमुखी निर्णय घेतला आहे.
या घटनेमुळे राज्यात वीज कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व संतापाची भावना असून त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.असा ही इशारा यावेळी देण्यात आला आहे. बहुजन विद्युत फोरम सह वीज अभियंता संघटना ,वीज कामगार महासंघ ,वर्कर्स फेडरेशन ,मागासवर्गीय कर्मचारी संघटना ,तांत्रिक कर्मचारी संघटना अशा विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
या सभेचे आयोजनासाठी बहुजन फोरमचे झोन पदाधिकारी व कृती समितीच्या संघटना प्रतिनिधींनी परिश्रम घेतले .