राष्ट्रीय महामार्गावरील खोटे नगरजवळ घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल साई गार्डनच्या बाहेर डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याने वार झाल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

जळगाव शहरातील शाहूनगर येथील रहिवासी सय्यद जावेद सय्यद अली (वय २८), याकूब खान दाऊद खान ( वय ४०) असे मित्रांसोबत राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल साई गार्डनच्या बाहेर दोन मोटरसायकलवर आलेल्या चार तरुणांनी डोळ्यात मिरची पूड टाकूनलुटण्याचा प्रयत्न केला. काही हाती न लागल्याने धारदार कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात सय्यद जावेद याच्या पाठीवर डोक्यापासून ते कमरेपर्यंत मोठा वार झाला असून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करून ४० टाके घेण्यात आले असून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार रात्री उशिरा तालुका पोलिसांनी दोन संशयित त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्याचे काम सुरू होते.








