नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) – एलपीजीचे नवीन कनेक्शन घेणं हे आता ऑनलाईन खरेदी करण्याइतकंच सोपे झाले आहे. सर्वसामान्यांसाठी चांगली गोष्ट म्हणजे यात बेसिक गॅस कनेक्शनवर जी सबसिडी उपलब्ध आहे, त्याच आधारावर घेतलेल्या इतर कनेक्शनवरही सबसिडीचा लाभ मिळणार आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत अशा प्रकारचे गॅस कनेक्शन बुक केले जाऊ शकतात. आपल्याला फक्त आपले आधार कार्ड आणि जुन्या गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रांची प्रत गॅस एजन्सीला द्यावी लागेल आणि नवीन गॅस कनेक्शनसाठी अर्ज करावा लागेल.
एकाच पत्त्यावर अनेक गॅस कनेक्शन घेतले जाऊ शकतात. सर्व गॅस कनेक्शन आधारशी जोडलेले असल्याने कोणत्याही प्रकारच्या फसवणुकची शक्यता नाही. सरकार एकाच पत्त्यावर अनेक गॅस कनेक्शनची सुविधा सतत विस्तारत आहे. ऑनलाईन अर्ज किंवा एलपीजी गॅस कनेक्शन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया देखील अगदी सोपी झाली आहे. या सुविधेअंतर्गत जर आई -वडील, भावंड किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही नातेवाईकांच्या नावाने आधीच गॅस कनेक्शन घेतले गेले असेल, तर कुटुंबातील इतर सदस्यही या पत्त्याचा लाभ घेऊ शकतात. फक्त या पत्त्याची पडताळणी करावी लागेल.