उत्तम जनसंपर्क, उच्चशिक्षित व्यक्तिमत्वाची मतदारसंघाला गरज
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा हि महाविकास आघाडीच्या वाटाघाटीनुसार शिवसेना (ठाकरे गट) कडे आली आहे. त्यानुसार आता नेत्यांसह कार्यकर्ते कामाला लागले आहे. लोकसभेसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) गटकडे पाचोरा येथील नेत्या वैशाली सूर्यवंशी ह्या सक्षम उमेदवार असून त्यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यांचा उत्तम जनसंपर्क असून त्यांच्यासारख्या उच्चशिक्षित व्यक्तिमत्वाची मतदारसंघाला गरज आहे.
वैशाली सूर्यवंशी शिवसेनेच्या नेत्या असून त्यांचे पिता दिवंगत आर. ओ. तात्या पाटील यांच्या समृद्ध राजकीय वाटचालीचा त्यांना वारसा आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यासह वैशालीताई यांना अमळनेर, एरंडोल, पारोळा तालुक्यातून देखील त्यांचे वलय आहे. शिवसेनेचे जनसंपर्क संघटन निर्माण व्हावे यासाठी त्यांनी कंबर कसली असून गाव तिथे शिवसेना हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या माध्यमातून शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी मोठ्या प्रमाणात संघटना वाढीसाठी जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या उपस्थितीत अनेक महिला-तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.
गेल्या काही महिन्यांमध्ये पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या महत्वपूर्ण सभा देखील पाचोरा-भडगावसह जळगाव लोकसभा मतदारसंघात झाल्या आहेत. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. पक्षाचे नेते देखील चार्ज झालेले असून मरगळ झटकून कामाला लागलेले आहे. वैशालीताई यांचे शिक्षण कृषी क्षेत्रात झाले असले तरी सर्वंकष ज्ञानपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. राजकीय समीक्षकांच्या मते, एक ते दोन नावे सोडले तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्याकडे सध्यातरी सक्षम उमेदवार नाही.
वैशालीताई सूर्यवंशी ह्या सक्रिय झाल्यामुळे शिवसैनिकांचा उत्साह अधिक वाढला आहे. वैशाली सूर्यवंशी यांनी मेळावे, बैठका घेऊन तरुणांची चांगली फळी तयार केली आहे. त्यांच्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षात अनेक महिला, तरुणांचे इन्कमिंग सुरू झाले आहे. नुकत्याच चाळीसगाव येथे झालेल्या संपर्क बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. लोकसभेमध्ये अभ्यासू खासदार व जळगाव जिल्ह्यासह खानदेशचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम खासदार असणे महत्वाचे झाले आहे. याचकरिता आता वैशालीताई सूर्यवंशी यांना उमेदवारी देऊन त्यांना लोकसभेत निवडून देण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून होत आहे. मतदारसंघात त्यांचा कायम राबता असून त्यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रात उत्तम काम केले आहे.
परिचय : वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी
वैशाली सूर्यवंशी ह्या कृषी क्षेत्रातील पदवीधर आहेत. निर्मल सीड्सच्या त्या संचालक आहे. वैशाली सुर्यवंशी यांना वडील तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांच्याकडून शेती, उद्योग, व्यवसाय आणि शिक्षणाचा वारसा लाभला आहे. कृषी कार्याचे सखोल ज्ञान असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या जीवनातील प्रश्नांची चांगली जाण आहे. बियाणे उद्योगात रस असल्याने तिला पीक आणि त्याचे उत्पादन याबद्दल खूप काळजी आहे. निर्मल फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी क्रांती घडवून आणली. विशेषतः, “महिला सक्षमीकरण” आणि “सामाजिक सुधारणा” मधील योगदाना
साठी तिला “पाचोरा आयकॉन” म्हणून सन्मानित करण्यात आले आहे आणि समता परिषदेद्वारे “शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी” सन्मानित करण्यात आले आहे.