पारोळा (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यकर्ते सुनिल देवरे यांची अंतरराष्ट्रीय लोकरक्षक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष अभिषेक हिंदू यांनी केली आहे.
सेनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार मुक्त भारत व जनसामान्यांना मदतीसाठी सदैव तत्पर राहणार असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व त्यांना कोणत्याही प्रकाराच्या मदतीसाठी सदैव धावून येणार आहे तसेच लवकरात लवकर इतर जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात येईल असे सुनील देवरे यांनी सांगितले. निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष वैभव शिंदे यांनी अभिनंदन केले. पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.