जळगाव (प्रतिनिधी ) ;- लोकमान्य आर्थोपेडिक्स हॉस्पिटलतर्फे आता जळगावातही रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य हे शस्त्रक्रिया करण्यासाठी उपल्बध राहणार असून रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यात रीबोटीक सांधेरोपण लोकमान्य आर्थोपेडिक्स या अग्रगण्य हॉस्पिटलतर्फे करण्यात येणार असून यात गुढघेदुखी, मणक्याचे स्लिप डिस्क सारखे आजार, सांधेदुखी, न जुळललेली हाडे, या आजारांचा समावेश आहे. यासाठी नोंदणी आवश्यक असून यासाठी २० ऑगष्ट शुक्रवार रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आयकॉन हेल्थ केअर सर्व्हिसेस अँड डायगोनस्टिक सेंटर , महेश प्रगती मंडळाजवळ रिंगरोड जळगाव येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. . तसेच ९६७३८५९१८५/ ८६६८७९४८१७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान रोबोटिकच्या साहाय्याने सांधेरोपण, स्पाईन एंडोस्कोपिक सर्जरी , अर्थोस्कोपिक लेसर सर्जरी आदी करण्यात येणार आहे.