जळगाव ( प्रतिनिधी ) – पुण्याच्या प्रख्यात लोकमान्य हॉस्पिटलची ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगावसह धुळ्यातही सुरु होत आहे . ही मेगा सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता या दोन्ही शहरात सुरु होत असल्याने रुग्णांचा वेळ आणि पैसे वाचणार तर आहेच त्यासोबतच आधुनिक उपचारासाठी सल्ला , तपासणी व निष्णात डॉक्टरांची सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहे .
लोकमान्य हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉ. सतिश काळे जळगाव आणि धुळ्यात रुग्णांची तपासणी करणार आहेत . रुग्णांनी आपल्या गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, पाऊल व घोट्याचे दुखणे तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावे हा उद्देश तर आहेच ; त्यासोबतच वैयक्तिक लक्ष आणि मार्गदर्शनामुळे रुग्णांची अनाठायी भीती दूर होऊन आजारावर मात करण्याचा आत्मविश्वास वाढणार आहे.
रुग्णांनी आपल्या हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता या संधीचा लाभ घ्यावा आणि योग्य उपचार व तपासणीसाठी नाव नोंदणी करावी . बुधवार (. २९ डिसेंम्बर २०२१) रोजी जळगावात आयकॉन हेल्थ केअर सर्व्हिसेस अँण्ड डायग्नोस्टिक सेंटर, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, जळगाव येथे सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत डॉ सतिश काळे रुग्णांची तपासणी करणार आहेत
धुळ्यात केशरानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन रोड, धुळे येथे याचदिवशी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत डॉ सतिश काळे रुग्णांची तपासणी करणार आहेत तपासणीला येतांना पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी रुग्णांनी – 9673859185 आणि 8668794817 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन लोकमान्य हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे .