जळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगीरी
जळगाव (प्रतिनिधी) – येथील एमआयडीसी परिसरातील कंपनीतून लोखंडी वायरची बंडले चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. हि चोरी कंपनीत पूर्वी काम करणाऱ्या कामगारानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दोनच दिवसात चोरीची घटना उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
जळगाव एम. आय. डी. सी. परीसरात असलेल्या चेतन प्रेसीजन टुल्स, सेक्टर या ठिकाणी दि. २४ रोजी रात्री कंपनीच्या गोडावून मधुन कोणीतरी अज्ञात इसमाने १ लाख २५ हजार किंमतीचे लोखंडी वायरचे तिन बंडल हे गोडावूनच्या मागील बाजुस असलेल्या भिंतीची खिडकी तोडुन आत प्रवेश करुन चोरुन नेले होते. म्हणुन कंपनीचे एच. आर. मॅनेजर योगेश भगवान सोनार, (वय ३४ वर्ष, रा. प्लॉट नं. 32, कमल पार्क,अयोध्या नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिल्यावरुन दि. २४ रोजी एम.आय.डी.सी. पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
किरण टूल्स कंपनीचे गोडाऊन हे ब-याच दिवसांपासुन बंद असल्यामुळे सदरची चोरी ही कंपनीतील यापुर्वी काम करणारा सुभाष पंडीत पाटील, (वय ३९ वर्ष, रा. विठ्ठल मंदीराजवळ, सुप्रीम कॉलनी, जळगाव) याने केले असल्याबाबतची माहीती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे दि. २५ रोजी रात्री त्यास सुप्रीम कॉलनी परिसरातून ताब्यात घेतले होते. त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले होते. त्याला गुन्हयाकामी अटक करण्यात येवुन त्याचे कडुन त्याने चोरी केलेला संपुर्ण मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला आहे.
त्यास न्यायमुर्ती सुवर्णा कुलकर्णी यांनी ३ दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. सदरची कारवाई स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. इम्रान सैय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, राहुल रगडे, विशाल कोळी, साईनाथ मुंढे, निलोफर सैय्यद, पो. चालक इम्तीयाज खान अशांनी केली आहे. त्याचे सोबत अजुन कंपनीतील कोण कामगार सामील आहे याची चौकशी सुरु असुन तो दहा वर्षापासुन कंपनीत काम करीत होता.