भुसावळ तालुक्यातील आचेगाव येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- भांडण का करतो असे बोलण्याचा रागातून एका तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी फावड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील आचेगाव येथे घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
माहिती अशी की, अजय उर्फ गजानन माळी (वय ३५, रा. आचेगाव, ता. भुसावळ) हा तरुण परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान सोमवार, दि.१६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गावातील राहणारा विशाल भगवान मोरे याला, भांडण का करतो असे गजानन याने विचारले. या कारणावरून गजानन माळी याला शिवीगाळ करत लोखंडी फावड्याने विशाल मोरे याने मारहाण केली. त्यामुळे त्याच्या मानेवर आणि नाकावर गंभीर दुखापत केली. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मारहाण करणारा विशाल मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कंखरे करीत आहे.