जळगांव (प्रतिनिधी ):- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

विद्यापीठातील प्रशाळा व इतर विद्याशाखेतील गावित सुमित्रा, ज्ञानेश्वर बहिराम, निकीता विसपुते, दीपक कोकणी तेजस्विनी सोनवणे, श्रध्दा देशमुख, स्वप्निल कोठारी, वंदना पवार, राहूल पावरा या विद्यार्थ्यांनी या कवी संमेलनात सहभाग घेऊन स्वरचित कवीता सादर केल्या. तर गोपाळ बागुल, सागर जाधव, दीपीका सोनार, योगेश सुर्यवंशी यांनी संकलीत कवीता सादर केल्या. प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हा कार्यक्रम म्हणजे या नवोदित कवींना किंवा कवी रसिकांना सर्जनशील बनविण्याचे माध्यम असून अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो असे सांगत त्यांनी कवीता सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनीषा महाजन यांनी केले. आभार पूजा निचोळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी इंग्रजी विभागपमुख प्रा.मुक्ता महाजन, हिंदी विभागप्रमुख प्रा.सुनील कुळकर्णी व आशुतोष पाटील यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक ऑनलाईन उपस्थित होते.







