पारोळ्यात शिंपी समाजाच्या महीलांचा हळदी -कुंकू कार्यक्रम
पारोळा ;- प्रत्येक क्षेत्रात पुरुषाबरोबर स्री देखील सक्षमपणे उभी राहुन कार्य करु शकते.हे अनेकवेळा सिध्द झाले आहे.
यासाठी समाजातील महीलांनी एकजुटीतुन कार्य करणे गरजेचे असुन आत्मविश्वासातुन समाजाच्या विकासासाठी वाटचाल करणे गरजेचे असल्याचे मत शिंपी समाजाच्या महीला अध्यक्ष अनिता चंद्रकांत शिंपी यांनी व्यक्त केले. येथील समाज कार्यालयात हळदी -कुंकूवाच्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी मंडळाच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
समाजातील महीला मंडळ सदस्य यांनी हळदीकुंकू देऊन वस्तुचे वाटप केले. यावेळी उपाध्यक्ष वर्षा शिंपी,सचिव कविता शिंपी नगरसेविका पल्लवी जगदाळे,सारिका शिंपी,रेखा बावीस्कर,वैशाली शिंपी,प्रतिभा शिंपी,मेघा शिंपी,सुरेखा मांडगे,वैशाली मेटकर,मिना जगताप,मित्तल सोनवणे,संध्या शिंपी,निशा जगताप,गायत्री सोनवणे,स्वाती मांडगे,जयश्री शिंपी,लता शिंपी,उज्वला शिंपी यांचेसह अनेक महीला उपस्थित होत्या. अनिता शिंपी पुढे म्हणाल्या कि,आजवर महीला मंडळाने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले आहेत.यापुढे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करुन युवतींचा आत्मविश्वास वाढणेकामी हक्कांचे व्यासपीठ तयार करुन विकासात्मक दर्जा उंचावणेकामी समाजातील वरिष्ठांचे मार्गदर्शन घेवुन कार्य केले जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सारिका शिंपी तर आभार सुरेखा मांडगे आभार मानले.








