प्रदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत मुंबईमध्ये घोषणा ; भाजपचा दिला राजीनामा

जळगाव (प्रतिनिधी) – राज्याचे माजी मंत्री, विरोधी पक्ष नेता, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे शुक्रवारी 23 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे देखील आम्हाला सांगितले अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, भाजपा मध्ये सतत अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाल्यामुळे आणि वेळोवेळी डावलले जात असल्यामुळे एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्याबरोबर कोण प्रवेश करेल याबाबत अजून सांगता येणार नाही। तसेच राष्ट्रवादीतून गेलेले अनेक गयाराम परत आयाराम होतील का हे पुढील काळात दिसून येईल असेही पाटील म्हणाले.







