खान्देशात एकमेव डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तंत्रज्ञान उपलब्ध
जळगाव – व्हेरिकोज व्हेन्ससाठी आता कुठल्याही शस्त्रक्रियेची गरज नसून लेझर किरणांद्वारे उपचाराचे तंत्रज्ञान खान्देशात एकमेव डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपलब्ध झाले आहे. या तंत्रज्ञानाचा शुभारंभ माजी खा. डॉ. उल्हास पाटील व कु. सारा यांच्या हस्ते करण्यात आले.
पाय दुखणे, पायावर सूज येणे, पायावर जखम होणे, रक्तवाहिनी फुटून रक्तस्त्राव होणे, पाय कुरूप दिसणे, पायावर चट्टे पडणे, पाय काळे पडणे, पायाला खाज सुटणे अशी साधारणत: व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे आहेत. व्हेरिकोज व्हेन्सचे निदान झाल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. आता मात्र शस्त्रक्रिया न करता लेझर किरणांद्वारे उपचार करणे सहज शक्य झाले आहे.
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात लेझरचे तंत्रज्ञान
खान्देशात एकमेव डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात लेझर किरणांद्वारे व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार केले जाणार आहेत. या सुविधेचा माजी खा. डॉ. उल्हास पाटील व कु. सारा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी सात रूग्णांवर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार करण्यात आले आहे.
लेझर किरणांद्वारे उपचाराचे फायदे
लेझर किरणांद्वारे केलेल्या उपचारामुळे कमी वेळ लागतो व रूग्णाला केवळ एक दिवसच रूग्णालयात भरती रहावे लागते, शस्त्रक्रियेच्या तुलनेत कामावर लवकर रूजू होता येते, व्रण रहित व बिनटाक्याचे उपचार होतात, सुरक्षित, प्रभावी आणि वेदनारहीत अशी ही उपचार पध्दती असून त्याचे उत्तम वैद्यकीय परिणाम मिळतात.
अशी आहे तज्ञ डॉक्टरांची टीम
व्हेरिकोज व्हेन्सच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत असून इंटरव्हेशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. राजकिरण राठी यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. गीत कटारीया, डॉ. रमेश इंगळे, डॉ. महेश मुरमे, डॉ. आशुतोष पंडीत ही टीम उपलब्ध राहणार आहे.