पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केली नियुक्ती
जळगाव (प्रतिनिधी) : जळगावातील पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी यांनी केली आहे.
ही नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये बुधवारी दिनांक १२ रोजी करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आल्याची चर्चा आहे. एलसीबीच्या निरीक्षकपदी चाळीसगावचे संदीप पाटील, जामनेरचे किरण शिंदे, यावलचे प्रदीप ठाकूर आदींची नावे चर्चेत होती. मात्र आता एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांचे नाव अंतिम झाले आहे. उद्या गुरुवारी दिनांक १३ जून रोजी बबन आव्हाड हे पदभार स्वीकारणार असल्याचे आहे. एलसीबीसह त्यांच्याकडे एमआयडीसीचा देखील तात्पुरता पदभार राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.