एलसीबीचे पळे यांच्याकडे राहणार तात्पुरता पदभार
जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबी पोलीस निरीक्षकाच्या प्रभारी पदभार पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली होती. मात्र त्यांच्या नियुक्तीला आयजी बी.जी.शेखर यांनी स्थगिती दिली असल्याचा दुजोरा डॉ. प्रवीण मुंढे यांनी केसरीराजशी बोलताना दिला. तसेच डॉ. मुंढे यांनी बोलताना सांगितले कि, सध्याची कायदा सुव्यवस्था पाहता हा पदभार किसनराव नजन पाटील यांना देण्यात आला होता परंतु आयजी बी.जी. शेखर यांनी एलसीबीमध्ये कार्यरत एपीआय जालिंदर पळे यांना देण्याचे सूचित केले असून हा पदभार तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी बोलताना सांगितले.








