जळगाव (प्रतिनिधी ) ;-पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पोलीस स्टेशन भाग -५ गुरन.२६७/२०१८ भादवि.क.४१९,४२०,४६७,४६८, १२०(ब)या गुन्हयातील आरोपी दयावान गौतम सोनवणे हा मिळुन येत नव्हता. सदर आरोपीताचे शोध कामी पोलीस अधीक्षकडॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षककिरणकुमार बकाले यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ.सुधाकर
अंभोरे, अश्रफ शेख, महेश महाजन, ईशान तडवी यांना रवाना केले होते. दयावान गौतम सोनवणे हा जळगाव शहरात समतानगर परिसरात असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळून त्यांनी तात्काळ पथक रवाना करुन दयावान गौतम सोनवणे वय – २४ रा.समतानगर, वंजारी टेकडी जवळ जळगाव यास ताब्यात घेवुन पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशनला ताब्यात दिले आहे .