लातूर (वृत्तसंस्था ) देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला एसटी आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हैबतपूर पाटीजवळ घडली असून या अपघातात दोन्ही वाहनांचे प्राचीन नुकसान झाले आहे
तुळजापूर देवीचे दर्शन घेऊन लातूर जिल्ह्यातील उदगीरकडे भाविक परतत होते. मारुती स्विफ्ट कारने ते घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. भाविकांची कार वेगात समोरुन येणाऱ्या एसटी बसला धडकली आणि हा अपघात घडला.
उदगीरच्या एका हॉस्पिटलमध्ये काम कऱणारे काही जण आणि नर्सिंग कॉलेजचे 2 विद्यार्थी उदगीर शहराकडे निघाले होते. हैबतपूर पाटी जवळ आल्यानंतर पुढून येणाऱ्या एस बसला कारने समोरासमोर जोरदार धडक दिली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या एकाला तातडीने लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले
अपघातातील मृतांची नावे अलोक खेडकर (वय-21) रा. उदगीर , अमोल देवक्तते (वय-24) रा. रावणकोळ ता. मुखेड जि. नांदेड , कोमल कोद्रे (वय-22) रा. दोरनाळ ता. मुखेड जि. नांदेड यशोमती देशमुख (वय-28) रा. यवतमाळ ,नागेश गुंडेवार (वय-27) रा. उदगीर एसटी बस ही उदगीरहून चाकूरकडे निघालेली होती. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर कारमधील भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी चक्क गाडीता पत्रा कापावा लागला. गॅस कटरच्या साहाय्याने गाडीचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.