जळगाव;- स्वसंरक्षणासाठी लाठी हे उत्तम हत्त्यार आहे. हे अगदी राजेमहाराज्यांच्या काळापासून ठाऊक आहे. जळगाव जिल्हा लाठी असोसिएशनने लाठी काठीच्या माध्यमातून महिला सबलीकरण करण्याचा मानस केला असल्याचे मत लाठी असोसिएशनचे सचिव आणि आर. जे. मार्शल आर्टचे प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे यांनी
“केसरीराज “शी बोलतांना सांगितले.
लाठी असोसिएशन जळगावच्या वतीने दिनांक 14 ऑगस्ट रोजी जागतिक पारंपरिक क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये मुलांना व मुलींना लाठी फिरवणे व लाठी-काठीचे डाव-पेच लाठी हातात असतांना आत्मरक्षण कसे करणार, इत्यादीचे प्रशिक्षण एकूण 100 खेळाडूंना 4 टप्प्यात देण्यात आले. आर. जे. मार्शल आर्टचे प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे पुढे म्हणाले की, स्वयंसिद्धाच्या माध्यमातून असे अनेक
स्वरांक्षणाचे डाव पेच महिला व मुलींना नियमित 15 वर्षापासून जिल्ह्यातील मुलींना देतच आहे व पुढे लाठी असोसिएशनच्या माध्यमातून देतील असे त्यांनी सागितले. या महिला सबलीकरणाच्या या कार्याला लाठी असोसिएशन महाराष्ट्र व इंडीया (भारतीय संघटना) पूर्ण सहकार्य राहील असेही ते म्हणाले. भविष्यात लाठी असोसिएशनद्वारा मुलांमध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होईल तसेच जागतिक स्तरावर खेळाडूंना स्पर्धा करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही राजेंद्र जंजाळे यांनी सांगितले.
या कार्यात अश्विनी निकम/जंजाळे महिला पोलीस कराटे प्रशिक्षक यांच्यासह आर. जे. मार्शल आर्टचे सर्व प्रशिक्षक नित्यनेमाने कार्यशील असतील असेही श्री जंजाळे यांनी मत व्यक्त केले.