जळगाव ( प्रतिनिधी ) – महापौर जयश्री महाजन यांच्या पुढाकाराने आज शहरातील ९ लसीकरण केंद्रांवर ६ हजार ६२ नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले.

आरोग्य प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून महापौर जयश्री महाजन यांनी शहरासाठी २४ हजार लसींचे डोस मागवले आहेत त्यातूनच आज लसीकरणाचा हा उच्चान्क गाठला गेला सर्वात जास्त म्हणजे १६४० लसींचे डोस काशीबाई विद्यालय या लसीकरण केंद्रातून देण्यात आले त्याखालोखाल १३०० डोस शाहुनगरातील लसीकरण केंद्रातून देण्यात आले शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे. महापालिकेच्या आरोग्य खात्याने या लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन महापौर जयश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते







