भडगाव ( प्रतिनिधी ) – कजगाव येथील रहिवासी व सैन्यदलात कार्यरत जवानाने जास्त आलेले पैसे बँकेला परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
कजगाव येथील रहिवासी व आई टी बी पी मध्ये आंध्रप्रदेशात कार्यरत असलेले सुनील गोटीराम साठे हे काल चाळीसगाव येथील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते पाचशे रुपये एटीएम मधून काढताना एटीएम मशीन मधून आठ हजार रुपये जास्तीचे आल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी आपल्या बँकेचे तपशील तपासले असता कुठलीही रक्कम निघाली नसल्याचे आढळुन आले मात्र जास्त आलेले आठ हजार रुपये त्यांनी कुठलाही स्वार्थ न पाहता बँकेला परत दिले त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल स्टेटबँकेचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.